Advertisement

युसुफवडगावात फोडले घर 

प्रजापत्र | Thursday, 15/01/2026
बातमी शेअर करा

केज दि.१५ ( प्रतिनिधी):तालुक्यातील युसुफवडगाव येथील एका घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण २,४०००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवार (दि.१३) रोजी रात्री घडली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस घरफोडीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत असून केज तालुक्यातील युसुफवडगाव येथील गोदावरी बाबुराव सूर्यवंशी (वय  ६५) यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी पेटीत ठेवलेली ८ ग्रॅमची सोन्याची पोत अंदाजे किंमत ८०,००० रुपये,९ ग्रॅमची सोन्याची बोरमाळ अंदाजे किंमत ९०,००० व रोख रक्कम ७०,००० रुपये असा एकूण २,४०००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवार (दि.१३) ते बुधवार (दि.१४) रोजी च्या सुमारास घडली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गोदावरी सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून बुधवार (दि.१४) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement