Advertisement

सवलतीच्या एसटी तिकिटांसाठी कोणतीही नवीन सक्ती नाही

प्रजापत्र | Saturday, 28/02/2026
बातमी शेअर करा

मुंबई : एसटीचा प्रवासदरम्यान ज्येष्ठ नागरिकांसह महिला प्रवाशांसाठी विशेष सवलती दिल्या जातात. तसेच परवडणाऱ्या दरात लांब पल्ल्याचा प्रवास होऊ शकतो. यामुळे प्रवाशांकडून नेहमीच मोठा प्रतिसाद दिसून येतो. अशातच आता एसटी महामंडळाने पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि सवलतींची अचूक नोंद ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. एसटी प्रशासनाने प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड लागू करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत अनेक अपडेट समोर येत होत्या. मात्र यावर आता एसटी महामंडळाने खुलासा केला आहे.

  एसटीचा प्रवास हायटेक होण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ प्रणाली लागू केल्याची माहिती समोर आली होती. याबाबत अनेक बातम्या देखील येत होत्या. परंतु राज्य परिवहन महामंडळाने एसटी प्रवासात या स्मार्टकार्डची अद्याप सक्ती करण्यात आली नसल्याची माहिती दिली आहे.

 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा खुलासा
सवलतीच्या एसटी तिकिटांसाठी NCMC कार्ड सध्या अनिवार्य नाही. ते अनिवार्य असल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आणि जनतेची दिशाभूल करणारा असल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने स्पष्ट केले आहे. एनसीएमसी स्मार्ट कार्डची नोंदणी प्रत्येक आगारात सुरू झालीय. पण अद्याप एसटी प्रवासात या स्मार्ट कार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेण्यासाठी सद्या स्मार्ट कार्ड अनिवार्य नसल्याचा खुलासा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केला आहे.

Advertisement

Advertisement