अंबाजोगाई दि.१९ (प्रतिनिधी): येथील परळी रोडवरील वसाहतीत एका चारचाकी वाहनातून गांजाची अवैध विक्री व वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच कारवाई करत २८ किलो गांजा,एक चारचाकी असा एकूण १३ लाख ७० हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून स्थानिक गुन्हे शाखा आणि अंबाजोगाई शहर पोलिसांनी ही संयुक्त कामगिरी केली.
अंबाजोगाई येथील परळी रोडवरील वसाहतीत एका चारचाकी वाहनातून गांजाची अवैध विक्री व वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे आणि त्यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला. संशयित पांढऱ्या रंगाच्या कारची झडती घेतली असता, त्यात दोन निळ्या रंगाच्या प्लास्टिक पोत्यांमध्ये २८ किलो गांजा मिळून आला असून १३ लाख ७० हजार ८६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रतीम राम तरकसे (वय २७),रा. आडस, ता. केज, प्रतीक भगवान पाटोले, अजय पाटोळे (दोन्ही रा. आसरडोह, ता. धारूर) आणि अजय देवकर (रा. अंदोरा, ता. कळंब, जि. धाराशिव) यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, अंबाजोगाई शहर पोलीस निरिक्षक शरद जोगदंड, उपनिरीक्षक सुशांत सुतळे, उपनिरीक्षक शिंदे, पो.ह. मारुती कांबळे, रामचंद्र केकाण, सुनिल अलगट, गोविंद भताने, सचिन आंधळे, अतुल हराळे, व पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथील पो.ह. वडकर, गायकवाड, तेजेस वाहुळे, पोलीस अंमलदार चादर गायकवाड, अंमलदार खरटमोल यांनी मिळून केली आहे.

