केज दि.२८(प्रतिनिधी): तालुक्यातील नांदूर घाट येथील मूकबधिर विद्यालयामध्ये शिक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या एका तरुण शिक्षकाचा अपघाती मृत्यु झाला आहे.
केज शहरातील रहिवासी खमरोद्दिन सदरोद्दीन फारुखी (वय ३८) हे तालुक्यातील नांदूर घाट येथील मूकबधिर शाळेत शिक्षक या पदावर कार्यरत होते. मात्र शुक्रवार (दि.२७)रोजी रात्री आठच्या सुमारास शाळेतून केजकडे येत असताना केज-बीड रोडवरील बरड फाट्यानजीक दुचाकी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या झालेल्या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते.सदरील अपघात झाल्यानंतर त्यांना लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र शनिवारी पहाटे त्यांचा मृत्यु झाला.
बातमी शेअर करा

