Advertisement

गुटख्याच्या गोडाउनवर छापा 

प्रजापत्र | Saturday, 28/02/2026
बातमी शेअर करा

  बीड दि.२८(प्रतिनिधी):शहरातील पेठ बीड भागातील चांदणे वस्ती येथील पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवलेला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच शनिवार (दि.२८) रोजी सकाळी ८ च्या सुमारास कारवाई केली असता ३,५९,३८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    बीड जिल्हयात मागील काही दिवसांपासून अवैध गुटखा,वाळू यावर पोलिसांकडून कारवाईचा सपाटा सुरू असून बीड शहरातील पेठ बीड भागातील चांदणे वस्तीत फेरोज दस्तगीर तांबोळी रा.चांदणे वस्ती ता.जि.बीड याने स्वतःच्या फायद्यासाठी पत्र्याच्या शेडमध्ये व घरामध्ये अवैध गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवलेला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच शनिवार (दि.२८) रोजी सकाळी ८.४५ च्या सुमारास सदरील ठिकाणी कारवाई केली असता ३,५९,३८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरील आरोपी फेरोज तांबोळी हा पोलिसांना पाहताच धटनास्थळावरून पळून गेला असून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीराम खटावकर,पो.ह.राहुल शिंदे,युनूस बागवान,गोविंद राख,स्वाती मुंडे,अशपाक सय्यद,मनोज परजणे,चालक नितीन वडमारे यांनी केली.

Advertisement

Advertisement