शिरूर कासार दि.१३ (प्रतिनिधी):तालुक्यातील दहीवंडी शिवारात ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळताच मंगळवार (दि.११) रोजी रात्री १२:३० च्या सुमारास कारवाई करत ५०,५००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बीड जिल्हात मागील काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीवर महसूल,पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाईचा सपाटा सुरु असून देखील अवैध वाळू वाहतूक सुरूच आहे.शिरूर कासार पोलीस ठाण्याच्या हाकेवर अंतरावर असलेल्या दहीवंडी शिवारात अवैध वाळूची वाहतूक करताना संदीप नारायण आघाव (वय ४५) रा.दहीवंडी ता.शिरूर कासार जि.बीड याच्यावर महसूल प्रशासनाने मंगळवार (दि.११) रोजी रात्री १२:३० च्या सुमारास कारवाई केली यात स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर क्र.एमएच २९ सी ३४७२ व विना नंबरची ट्रॉली त्यात एक ब्रास वाळू असा एकूण ५०,५००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शिरूर कासार पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना बोलावून सदरील ट्रॅक्टर त्यांच्या ताब्यात देण्यात आला.कृष्णा रत्नपारखे यांच्या फिर्यादीवरून बुधवार (दि.१२) रोजी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सदरील कारवाई नायब तहसीलदार गणेश दहिफळे, मंडळ अधिकारी श्री.सानप ,ग्राममहसूल अधिकारी कृष्णा रत्नपारखे यांनी केली.

