Advertisement

 शेतकऱ्यांना मोठा झटका! ३० लाख शेतकरी २२ व्या हप्त्याला मुकणार?

प्रजापत्र | Friday, 13/02/2026
बातमी शेअर करा

दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत असणाऱ्या शेतकऱ्यांना यावेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार देशभरातील ३०,१८,३६१ शेकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता जमा होणार नाहीये.

     केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत शेतकऱ्यांचे बँक खात्यांना आधार कार्ड जोडणे ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र जवळजवळ ३० लाख शेतकऱ्यांचे बँक खाते अजूनही आधार कार्ड लिंक नाहीये. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही त्यांना पुढील हप्ता मिळवण्यासाठी अडथळा निर्माण होणार आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र ही रक्कम मिळण्यासाठी खाते आधारांशी लिंक असणे आणि ई- केवायसी प्रक्रिया पुर्ण करणे बंधनकारक आहे. सरकारकडून या पूर्वीही अनेकदा ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. तरीही आतापर्यंत काही शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही.बँक खाते आणि आधार लिंक नसल्यास लाभार्थ्यांची ओळख पडताळणी पूर्ण होत नाही, तो पर्यंत या योजनेचा निधी थेट खात्यात जमा करण्याची प्रक्रिया थांबवली जाते. त्यामुळे २२ वा हप्त्याची रक्कम अनेकांना मिळणार नाही, अशी स्पष्ट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

 

तुमचे नाव या यादीत आहे की नाही,
या यादीमध्ये तुमचे नाव आहे का हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लाभार्थी यादी तपासता येते. तसेच, जवळच्या बँकेत किंवा सीएससी केंद्रात जाऊन आधार लिंक स्थिती आणि ई-केवायसी पूर्ण झाली आहे का, याची खात्री करून घ्यावी. आवश्यक असल्यास तत्काळ प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्ताही अडकू शकतो.

Advertisement

Advertisement