Advertisement

तर मी मंत्रि‍पदाचा राजीनामा देईन

प्रजापत्र | Friday, 13/02/2026
बातमी शेअर करा

 दिल्ली : लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुरुवारी मुंबईत केलेल्या कारवाईने राज्यात खळबळ उडाली आहे. कारण एसीबीच्या कारवाईत गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या क्लार्कला अटक करण्यात आली. राजेंद्र ढेरंगे असे या क्लार्कचे नाव असून ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला पकडण्यात आलं. मंत्रालयात दुसऱ्या मजल्यावर ही कारवाई करण्यात आली. ज्या खात्यातील क्लार्कवर ही कारवाई करण्यात आली त्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ हे या घटनेमुळे अडचणीत आले असून आज त्यांनी याप्रकरणी आपली बाजू मांडत लाच घेणाऱ्या क्लार्कवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं म्हटलं आहे.

      तुमच्या मंत्र्यालयातील हा क्लार्क होता, तर ही जबाबदारी तुमच्यावरही येत नाही का? असा प्रश्न आज नवी दिल्ली इथं पत्रकारांकडून मंत्री नरहरी झिरवळ यांना विचारण्यात आला. त्यावर झिरवळ म्हणाले की, "ही जबाबदारी आहेच, नाही म्हणून चालणार नाही. त्याने जे कृत्य केलंय, त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही, हे मी खात्रीने तुम्हाला सांगतो. या प्रकरणाची चौकशी व्हावी. चौकशीत जर या लाच प्रकरणाची लिंक माझ्यापर्यंत जोडली गेली, तर मी मंत्रि‍पदाचा राजीनामा देईन," असं झिरवळ यांनी स्पष्ट केलं आहे.

Advertisement

Advertisement