Advertisement

परळीत महापशुधन एकत्र  

प्रजापत्र | Friday, 13/02/2026
बातमी शेअर करा

  परळी दि.१३ (प्रतिनिधी) राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन एक्स्पोचे परळीत आज सकाळी उद्घाटन करण्यात आले. मंत्री पंकजाताई मुंडे, आ.धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पशुधन एक्स्पोचे उद्घाटन करण्यात आले.           

 पहिल्यांदाच होत असलेल्या या पशुधन एक्स्पोत देशभरातील विविध प्रजातींचे पशुधन दाखल झाले आहे. देशभरातून आलेल्या विविध प्रजातींचे पशुधन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. नवीन तंत्रज्ञान व दर्जेदार पशुधनाची माहिती घेण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातूनही पशु उत्पादक, शेतकरी, पशुप्रेमी मोठ्या संख्येने परळीत दाखल झालेले आहेत. मंत्री पंकजा मुंडे आणि आ.धनंजय मुंडे यांनी स्वतः एक्स्पोमध्ये फिरून पशुंच्या विविध प्रजातींची माहिती घेतली.

Advertisement

Advertisement