Advertisement

कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली

प्रजापत्र | Sunday, 02/11/2025
बातमी शेअर करा

 मुंबई : राज्यभरात आमच्या आंदोलनाचं (Farmer Protest) कौतुक करण्यापेक्षा बदनामी अधिक केली जातेय. आम्ही मॅनेज झालो असं बोलताय, लाज वाटत नाही का? शेतकरी आंदोलन (Bacchu Kadu Farmer Protest) बंद करा, असे आमचे कार्यकर्ते म्हणतात. काहीजण मॅसेज करताय त्यांनी ते केल्यापेक्षा आंदोलनात सहभागी व्हा ना. आज आम्हाला आनंद आहे कर्जमाफीचा मुद्दा होता जो संपला होता, तो बच्चू कडूमुळे आज जिवंत झालाय. पण आमच्यावर कमेंट, आरोप आणि टीका करण्यापेक्षा गावा गावात आंदोलन उभं करा ना, अशा शब्दात खडेबोल सुनावत प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

 
       आता ८ वा वेतन लागू केला, का तर बिहार निवडणूक आहे म्हणून. आम्ही 27 पासून आंदोलन सुरू केलंय. आम्ही मरायला पाहीजे असं काहींना वाटत होतं. अनेकांवर गुन्हे दाखल झालेत. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल केलेत. कोर्टाचा आदेश आला तर आम्ही जेलभरो करायला सुरुवात केली. पण आमची परिस्थिती दाखवायला मीडिया कमी पडला. अशी खंतही बच्चू कडू यांनी बोलून दाखवली. राज्यात मराठयांचे आंदोलन झाले. ओबीसी आंदोलन झाले. मराठीच्या मुद्दयांवर मोर्चा झाला. हे भावनिक विषय आहे. शेतकऱ्याचा मुद्दा वेगळा आहे. बाकीच्यांची ताकद मोठी आहे. असेही ते म्हणाले.दरम्यान, 2020-21मध्ये कर्जमाफी झाली. दोन कर्जमाफी झाली ती थकीत कर्जदारांची झाली. नियमित वाल्यांची नाही. काल जर कर्जमाफी झाली असती तर शेतकऱ्यांचं नुकसान झाले असते. सक्तीची वसुली आणि वसुली यात फरक आहे. शासन निर्णय आहे की, वसुली थांबवा. जर वसुली केली तर बच्चू कडू ठोकणार. असा इशाराही बच्चू कडू यांनी यावेळी दिला. दुष्काळातले नियम लावले.मुख्यमंत्री यांचं स्टेटमेंट नीट ऐका. आजही एकनाथ शिंदे म्हणाले की कर्जमाफी होणार. आमच्या आंदोलनाने कर्जमाफीची तारीख मिळाली की नाही? सगळे शेतकरी नेते होते. सगळ्यांवर आरोप करायला निघाले. घरून बसल्या बसल्या आरोप करणं सोपं आहे. 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी होणार याला तारीख नाही म्हणायचं का? असा सवाल करत बच्चू कडू यांनी सडकून टीका केलीय.

 
 

Advertisement

Advertisement