Advertisement

परळीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

प्रजापत्र | Tuesday, 09/09/2025
बातमी शेअर करा

 परळी दि.९(प्रतिनिधी):  रेल्वे स्थानक परिसरात सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आठ दिवसातच अत्याचाराची आणखी एक घटना परळी शहरातील बरकरत नगर भागात सोमवार (दि.८) रोजी घडली. या प्रकरणी चौघांविरोधात संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     अधिक माहितीनुसार परळी शहरातील बरकत नगर भागातील १२ वर्षांची मुलगी दुकानावर गेली असताना रस्त्यातून तिला उचलून नेत अंधारातील एका मार्गावर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याच गल्लीत राहणाऱ्या चार युवकांनी ठरवून हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. चार पैकी दोन आरोपींनी तिला पकडून तिच्यावर अत्याचार करण्यासाठी इतर दोघांनी मदत केली. यावेळी दोघांनी अमानवी पद्धतीने अत्याचार केल्याने संपूर्ण शहरात या घटविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.सदरील चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई संभाजीनगर पोलीस करत आहेत. 

Advertisement

Advertisement