Advertisement

वीज कोसळून दोन महिलांचा जागीच मृत्यु

प्रजापत्र | Friday, 18/07/2025
बातमी शेअर करा

नागपूर  : वीज कोसळून दोन महिलांचा (Women died) मृत्यु झाला आहे तर इतर पाच महिला जखमी झाल्या आहेत. रामटेक तालुक्यातील मौजा सोनेघाट येथे ही घटना घडली आहे. शुक्रवार (दि.१८) रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही वीज पडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतात २५ महिला काम करत होत्या. (Women) दुपारची जेवणाची सुट्टी करताना वीज कोसळल्याची घटना घडली आहे. मंगलाबाई मोटघरे (वय ४०) रा. शितलवाडी परसोडा ता. रामटेक,वर्षा देवचंद हिंगे (वय ३३) रा. भोजापुर अशी मृत्यु झालेल्या महिलांची नावे आहेत. 

Advertisement

Advertisement