बीड दि.१३(प्रतिनिधी): शहरात(Beed) पुन्हा एकदा तोतया पोलिसांच्या टोळीने हातचलाखी करत साडेतीन तोळे सोने लंपास केल्याची घटना शनिवार (दि.१२) रोजी घडली असून एकूण ५५,००० हजारांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी दोन (Crime)चोरट्यांविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, बीड(Beed)शहरातील गुजराती कॉलनी येथे अल्का सुभाष पगारिया (वय ६१) यांना आम्ही पोलिस आहोत अशी बतावणी करून अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांचा विश्वास संपादन करत हातचलाखी करून तीन ते साडे तीन तोळ्यांच्या बांगड्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवार (दि.१२) रोजी सकाळी ८:४५ वाजता घडली असून एकूण ५५,००० हजारांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी (Crime)दोन चोरट्यांविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा