बीड-जिल्ह्यातील ६०६ पोलीस अंमलदार आणि सहाय्यक फौजदार यांच्या बदल्या झाल्यानंतर आता चालक संवर्गातील ५८ कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत.कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची दुसरी यादी पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी जाहीर केली आहे.मागच्या दोन दिवसांत जिल्हा पोलीस दलातील एकूण ६६४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने बीडच्या इतिहासात याची नोंद होणार आहे.
पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी पदभार घेतल्यापासून पोलीस दलात शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी अनेक निर्णयातून आपल्या कार्याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिल्यानंतर पोलीस दलातील बदल्यांमध्ये त्यांनी लॉबिंग ही थांबवली.वशिलेबाजी आणि पुढाऱ्यांच्या शब्दांना न जुमानता बदल्यांचे पारदर्शी धोरण त्यांनी बीड जिल्हयात पहिल्यांदाच राबविले होते.काल ६०६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर आता चालक संवर्गातील बाकी असलेल्या ५८ जणांच्या संदर्भाने पोलीस अधिक्षक यांनी चर्चा केली होती.कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अखेर या सर्वांच्या बदल्यांची दुसरी यादी आता समोर आली असून आतापर्यंत ६६४ कर्मचारी बदलीपात्र ठरले आहेत.दरम्यान अंमलदार यांच्या बदल्या झाल्यानंतर आता पुढच्या आठवड्यात ठाण्यांच्या बाबतीतील काही बदल पाहायला मिळतील असे अपेक्षित आहेत.