बीड-सामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाची कर्मचारी व एका रिक्षा चालकात झालेल्या हमरीतुमरीमुळे बीडमध्ये वातावरण तापले असून मागच्या दीड तासांपासून बस स्थानकाच्या बाहेर तेही भर रस्त्यावर प्रवाशांना घेऊन एसटी बसेस उभा असल्याचे चित्र आहे.आधीच वर्दळीचे ठिकाण आणि त्यात बस थेट रस्त्यावर उभ्या राहिल्यामुळे वाहतुकी कोंडीला सुरुवात झाली असून वाहतूक शाखेचे सपोनि सुभाष सानप व त्यांची टीम रस्त्यावर उतरली आहे.मात्र लालपरीची चाक थांबल्याने प्रवाशांचा जीव मेटाकुटीला आला आहे.
मांजरसुम्भा येथे एका बसमधील चालक आणि वाहकाला एका रिक्षा चालकाने शिवीगाळ केली होती.त्यानंतर बार्शी नाक्यावरही पुन्हा असाच प्रकार घडला.यावेळी बसच्या काचा फोडण्यात आल्या असून चालक आणि वाहकाला धक्काबुकी झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आक्रमक भूमिका घेत बस जाग्यावरच उभ्या करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे मागील एक ते दीड तासापासून रस्त्यावरच बस उभा राहिल्या असून प्रवाशी तात्काळले आहेत.पेठ बीड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलेली भूमिका प्रवाशी वर्गासाठी मेटाकुटीला आणणारी ठरत आहे. मागच्या दीड तासापासून रस्त्यावरच सुरु असलेल्या या गोंधळामुळे वाहतुकीचा ही प्रश्न निर्माण झाला आहे.
नियम फक्त खाजगी वाहतूकदारांना
जालना रोडवर विशेष करून अण्णाभाऊ साठे चौकाच्या पुढे रात्री १० पर्यंत एकही खाजगी गाडी उभा राहिली तरी त्या बसेसवर तात्काळ कारवाई होती.वाहतूक शाखा आणि आरटीओचे पथक या वाहनांवर कारवाईसाठी सक्रिय असल्याचे अनेकदा समोर आले.वर्दळीच्या ठिकाणी बस उभ्या राहिल्या तर वाहतूकदारांना मोठी अडचण होती त्यामुळे १० च्या आत एकही ट्रॅव्हल्स चालकांनी गाडी या रस्त्यावर आणू नये याच्या सक्त सूचना आहेत पण आता मागच्या दीड तासापासून रस्त्यावरच उभ्या असलेल्या बसेसवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून प्रवासी वर्ग मात्र मेटाकुटीला आल्याचे चित्र आहे.