Advertisement

सोमवारी अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर

प्रजापत्र | Thursday, 15/05/2025
बातमी शेअर करा

 बीड दि. १५ (प्रतिनिधी ) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री (Ajit pawar)अजित पवार सोमवारी बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्हा नियोजन समितीसह इतरही बैठका घेणार आहेत. (Beed)बीडचे पालकमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा बीडचा तिसरा दौरा असणार आहे.
          बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहेत. अजित पवारांनी मागच्या दौऱ्यात जिल्हा प्रशासनातील विविध बाबींचा आढावा घेतला होता, तसेच प्रशासन गतिमान करण्याच्या सूचना दिल्या होत्या. बीड (Beed)जिल्ह्यात विमानतळ तसेच इतर बाबींसाठी अजित पवारांनी पुढाकार घेतला होता. अजित पवारांच्या मागच्या दौऱ्यानंतर बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बदली होऊन विवेक जॉन्सन बीडचे जिल्हाधिकारी म्हणून पाहत आहेत.
आता (Ajit pawar)अजित पवार सोमवारी(दि.१९ ) बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यात ते नियोजन समितीची बैठक, खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आणि विकास योजनांची आढावा बैठक घेणार आहेत. विशेष म्हणजे अजित पवारांचा हा बैठकांचा सपाटा सकाळी ८ : १५ वाजताच सुरु होणार आहे. या दौऱ्यात अजित पवार काही राजकीय कार्यक्रम घेणार का हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

Advertisement

Advertisement