बीड दि.१५(प्रतिनिधी): बीड (Beed)शहरामध्ये दहा गाईसह दोन वासरे घेऊन जाताना (दि.१४) बुधवार रोजी रात्री टॅम्पो पकडला असून यातील जनावरे व टेम्पो असा एकूण १० लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी पाच जणांविरोधात शिवाजीनगर (Shivajinagar police)पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेम्पो क्र.एम.एच.१७ सीव्ही.७६६४ यामध्ये बेकायदेशीर रित्या दहा गाई आणि दोन वासरे हैद्राबादकडे नेली जात होती. हा टेम्पो शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पकडण्यात आला.यातील जनावरे व टेम्पो असा एकूण १० लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात (Beed)आला आहे.या प्रकरणी माधव कारभारी खेमणर (रा.चन्नेगाव ता.संगमनेर जि.अहिल्यानगर), संकेत बाळासाहेब लांबगे (रा.लोणी प्रवारा ता.राहता जि.अहिल्यानगर), असनगरी श्रीसाई लांब (रा.इल्ली मेंदू, इब्राहीम पटनम रा.तेलंगणा), उपारी सतई (रा.जहगा इलिमेंदू इब्राहीम पटनम रा.तेलंगणा), मल्लया असनगरी (रा.जहगा इलिमेंदू रा.तेलंगणा) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनावरे शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.वैभव जाधव यांच्या फिर्यादीवरून सदरील कारवाई करण्यात आली आहे.