बीड दि. १४ (प्रतिनिधी ) : पूर्णवादी बँकेचे संचालक असलेले तेलंगाव येथील प्रसिद्ध व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेंद्र कलंत्री यांच्यावर बँकेने माजलगाव आणि परळी शाखेचे पालक संचालक म्हणून जबाबदारी टाकली आहे.
बीडच्या (Beed)पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेमध्ये डॉ. सुरेंद्र कलंत्री हे संचालक म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांच्यावर आता बँकेने अधिकच्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. बँकेच्या वतीने विविध शाखांसाठी पालक संचालक जाहीर करण्यात आले असून यात माजलगाव आणि परळी(parali) शाखेसाठी डॉ. सुरेंद्र कलंत्री यांना पालक संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यासोबतच डॉ. सुरेंद्र कलंत्री यांना बँकेच्या गुंतवणूक उपसमितीच्या अध्यक्षपदी तर लेखापरीक्षण उपसमितीच्या सदस्यपदी निवडण्यात आले आहे. डॉ. सुरेंद्र कलंत्री एक प्रथितयश व्यावसायिक असून सामाजिक कार्यांमध्ये देखील त्यांचा सक्रिय वावर असतो. त्यांच्या याच अनुभवाचा फायदा त्यांच्या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून बँकेला(Bank) होणे अपेक्षित आहे.
बातमी शेअर करा