Advertisement

अखेर जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती अनिश्चित काळासाठी  पुढे ढकलली

प्रजापत्र | Tuesday, 06/05/2025
बातमी शेअर करा

बीड दि.६ (प्रतिनिधी):  जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ११२२ पोलीस पाटील भरतीचे जाहिरात जारी करण्यात आली होती. परंतु मराठा समाजाचा एसइबीसी नव्याने सामील झाल्यामुळे या प्रवर्गात बिंदु आरक्षित नसल्याने बीड जिल्हाधयकारी विवेक जॉन्सन यांनी  जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहे. 
    मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आल्यानंतर, या नव्या आरक्षण व्यवस्थेमुळे पोलीस पाटील भरतीतील बिंदू आरक्षण निश्चित करण्यात अडचणी निर्माण झाल्या. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सदर भरती प्रक्रिया  स्थगित करत पुढील आदेशापर्यंत ती पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे भरतीची वाट पाहणाऱ्या असंख्य उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

Advertisement

Advertisement