बीड-बीड-चौसाळा रोडवरील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलीस निरीक्षक देविदास गात व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या वर्षा शिंदे यांनी छापा मारून दोन महिलांना ताब्यात घेतले आहे.नेकनूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चौसाळयातील हॉटेल जानकीमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक देविदास गात व सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे यांना कारवाईचे आदेश पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी दिले होते.त्यानुसार सोमवारी (दि.५) सायंकाळी ५ च्या सुमारास जानकी हॉटेलवर डमी ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.यावेळी हॉटेलचा व्यवस्थापक देखील पोलिसांच्या ताब्यात असून नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
जानकीवर यापूर्वीही कारवाई
बीड-चौसाळा रोडवरील हॉटेल जानकीमध्ये वेश्या व्यवसाय नवीन नाही.यापूर्वी देखील पंकज कुमावत यांच्या काळात या हॉटेलवर छापा मारण्यात आला होता अशी माहिती आहे.आता पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या आदेशाने दुसऱ्यांदा याच हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे.