बीड दि.५(प्रतिनिधी): बीड (Beed)नगर पालिकेच्या अनागोंदी आणि भ्रष्ट कारभारामुळे शहरवासियांना पाणी मिळत नसल्याने नागरीकांत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. पाणी द्या, पाणी द्या असा अर्त टाहो जनता फोडत असतांना प्रशासन मात्र हातावर हात मांडून आहे. नगर पालिकेला जाग आणण्यासाठी आणि (Shivsena)शहरवासियांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी आज (दि.५) सोमवार रोजी उबाठा गट शिवसेनेच्या वतीने नगर पालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
नगर पालिका प्रशासनाच्या विरोधात सध्या शहरवासियात संताप (Beed)व्यक्त केला जात आहे. शहरवासियांना पाणी मिळत नसल्याने नागरीकांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. आज शिवसेनेने लक्षवेधी आंदोलन केले. न.प.ला मडक्याचे तोरण बांधून कार्यालयासमोर मडके फोडून न.प.चा निषेध करण्यात आला आहे. न.प.च्याविरोधात शिवसैनिकांची प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केली. शहराला नियमित व आठ दिवसाला पाणी पुरवठा करण्यात यावा, शहरात पालिकेचे पाणी पुरवठा टँकर (Shivsena Uddhav balasaheb thackeray)उपलब्ध करावे, अमृत पेयजल योजना रखडलेली आहे ती वेळेत पूर्ण करावी, जलप्राधिकरणाने वेळेत काम पूर्ण केले नाही म्हणून त्यांना तंबी देण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी आज उबाठा गटाच्या वतीने करण्यात आल्या.हे आंदोलन जिल्हा प्रमुख उल्हास गिराम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी महिला जिल्हा आघाडीच्या मिराताई नवले, संजय महादौर, राजु महुवाले, मशरू पठाण, पंकज कुटे, सुशिल पिंगळे, मुकूंद पाटील, सतिष सालपे,गुजर, रवि वाघमारे, सचिन चंदनशिव, लोंढे निलेश, शामसुंदर जाधव, प्रतिक वाघमारे, दिलीप पवार, गणेश लोेणकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.