शिरूर कासार दि.२४(प्रतिनिधी): तालुक्यातील (shirur kasar)खालापुरी शिवारात तीन जणांनी दुचाकी आडवी लावत एकाला (दि.१८) शुक्रवार रोजी सायंकाळी सातच्या सुमारास लुटल्याची घटना घडली असून ६१,००० हजारांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी शिरूर कासार (Shirur police)पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाभरात (Beed)लूटमार,चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अर्जुन भाऊराव धांडे (वय ६५) रा.लिंबा हे दुचाकीवरून गावी जात असताना शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी शिवारात तोंड ओळख असलेल्या (Crime)तीन जणांनी दुचाकीला धक्का देऊन खाली पाडत खिशातील रोख रक्कम व सोन्याची अंगठी असा एकूण ६१,००० हजारांचा मुद्देमाल लंपास लंपास केल्याची घटना (दि.१८) शुक्रवार रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली असून अर्जुन धांडे यांच्या फिर्यादीवरून (दि.२३) बुधवार रोजी तीन जणांविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत (Beed police) आहेत.