Advertisement

  शॉर्टसर्किटने गोठ्याला आग

प्रजापत्र | Saturday, 19/04/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१९(प्रतिनिधी ):तालुक्यातील (Beed)वाघिरा येथील रहिवासी बापुराव नरहरी आजबे यांचे लिंबागणेश येथील काळवाडी शिवारात गट नंबर २८० मध्ये शेतजमीन असुन (दि.१८) शुक्रवार रोजी शॉर्टसर्किटनेमुळे लागलेल्या आगीत त्यांचा गोठा व शेतीचे साहित्य (Farmer)असे एकूण अडीच लाखांचे नुकसान झाले. 

           त्यांचा मुलगा शेतावर (दि.१९) रोजी सकाळी घरी पाणी नेण्यासाठी(Fire) आला असता गोठा आगीत भस्मसात झाल्याचे कळाले.गोठ्यातील शेतीमाल कांदा, दोन एक्करमधील गोळा केलेले ठिबक तसेच एक एक्कर मधील स्प्रिंकलर, शेतीकामासाठी आवश्यक आवजारे आणि सागवानाची झाडे एकुण जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असुन गोठ्याच्या जवळुन जाणार्‍या विद्युत तारेच्या शार्टसर्कीटमुळे आग लागल्याचे शेतकरी बापुराव नरहरी आजबे यांनी म्हटले आहे. (Beed)सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी सदरील घटनेची माहिती देताच तहसीलदारांनी पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.  

Advertisement

Advertisement