Advertisement

शेतकऱ्यांनो आता या 'दगाबाज' सरकारचाच 'पंचनामा' करा!

प्रजापत्र | Saturday, 08/11/2025
बातमी शेअर करा

 परभणी: अतिवृष्टीमुळे आयुष्य संपले अशा स्थितीत असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "शेतकऱ्यांवर झालेले कर्ज आणि नुकसानीमुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. या 'दगाबाज' राज्य सत्कारचा पंचनामा करा आणि जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत 'मतबंदी' करा," असे आक्रमक आवाहन ठाकरे यांनी केले.

    परतूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले, "शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात माल विकल्याशिवाय या सरकारला खरेदी केंद्र सुरू करता येत नाही. सरकारने आकर्षक शब्दांत पॅकेज घोषित केले, पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. 'नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी केवायसी करा' असे सांगून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. पीक विमा ही शेतकऱ्यांची मोठी थट्टा आहे. शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत, अधिकारी त्यांना मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहेत. अधिकारी दगाबाजपणे वागत असतील, तर शिवसैनिकांनी त्यांना थेट मुख्यमंत्री यांच्याकडे घेऊन जावे लागेल." असा इशारा ठाकरे यांनी दिला.

Advertisement

Advertisement