शिरूर कासार दि.३ (प्रतिनिधी ):तालुक्यातील बोरगाव चकला येथे अज्ञात चोरटयांनी घराचा दरवाजा तोडून साड्यांसह नगदी रक्कम असा एकूण ८३ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवार (दि.१) रोजी भरदिवसा घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर कासार तालुक्यातील बोरगाव चकला येथील बबन दादाबा झिंझुर्डे (वय ६९) यांच्या घराचे कुलूप अज्ञात चोरटयांनी तोडून आतमध्ये प्रवेश करत घरातील साड्या,नगदी ८० हजार रुपये असा एकूण ८३ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवार (दि.१) रोजी भरदिवसा २ ते ६ च्या सुमारास घडली असून आपल्या घरामध्ये चोरी झाल्याचे बबन झिंझुर्डे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चकलांबा पोलिस ठाण्यात रविवार (दि.२) रोजी अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करत चकलांबा पोलीस आहेत.

