Advertisement

मुंबईतल्या आंदोलकांसाठी बीडमधून भाकरी

प्रजापत्र | Saturday, 30/08/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.३० (प्रतिनिधी): मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले असून लाखोंनी समाज बांधव त्यांच्या सोबत मुंबईत गेलेलं आहेत. परंतु आझाद मैदान परिसरातील हॉटेल्स, दुकाने बंद (Shop)असल्याने आंदोलकांची उपासमार होत असल्याचे चित्र दिसल्यानंतर (Beed)बीड जिल्ह्यातील गावा गावातून आंदोलकांसाठी भाकरी गोळा करून पाठविल्या जात आहेत.
      मराठा आरक्षणासाठी लाखोंनी मराठा समाज मनोज जरांगे(Manoj Jarange) यांच्या सोबत मुंबईत दाखल झालं आहे . यावेळी (Mumbai)मुंबईतली स्थानिक हॉटेल, आणि दुकाने बंद आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलक असताना त्यांची उपासमार होत असल्याचे अनेक व्हिडिओ, फोटो व्हायरल होत आहेत. अश्या वेळी बीड(Beed) जिल्ह्यातील गुंदावाडी येथून आंदोलकांसाठी भाकरी गोळा करून अनेक गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत तर बीड जिल्ह्यातील गावा गावात आंदोलकांसाठी भाकरी गोळा करण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे . यानुसार बीड जिल्ह्यातील बीड, वडवणी , माजलगाव , गेवराई तालुक्यातील अनेक गावात भाकरी गोळ्या केल्या जात आहेत तर अनेक गाड्या भाकरी घेऊन मुंबई कडे निघाल्या आहेत. इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असे घडत आहे की,(Mumbai)मुंबईतील आंदोलनकर्त्यांसाठी तब्बल ४०० किलोमीटर अंतरावरून भाकरी पुरवली जात आहे.

Advertisement

Advertisement