बीड दि.२४(प्रतिनिधी): आम्ही शांततेत (Mumbai)मुंबईला जाणार आणि शातंतेत मराठा आरक्षण घेणार, मराठा समाजावर आलेले संकट मोडून काढणार असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं. मराठा समाजाच्या सभेमध्ये डीजे वाजवू दिला नाही, पण यापुढे बीडमध्ये कुठेही डीजे वाजवू देणार नाही हे नक्की. सत्ता येत असते, ती बदलत असते हे लक्षात ठेवा असा इशारा(Manoj jarange) मनोज जरांगे यांनी दिला.
बीडमध्ये (Beed)आमच्या सभेमध्ये अडचणी निर्माण केल्या जातात, जरा थांबा, आम्ही मुंबईत येतोय. त्यावेळी काय करायचं ते करा असं थेट आव्हान मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं. सरकारने जर मराठ्यांना आरक्षण दिलं, आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही मुंबईला कशाला येऊ? इथूनच मंत्रालयावर गुलाल उधळतो.गडबड घोटाळा करु नका. त्यामुळे मराठा समाजावर संकट घोंघावतंय. ते संकट आता मोडून काढायचं आहे. तुमच्या आणि माझ्या भावनांचा सत्ताधाऱ्यांनी वापर करुन घेतला. मराठ्यांची ताकद मोठी आहे, पण आपण विचारांनी चाललो नाही. त्यामुळे आपल्या मुलांचं नुकसान झालं. प्रत्येकाने आपला वापर केला. उभ्या पिढ्यांचं वाटोळं झालं. यापुढे आपण विचारांनी चालायचं.बीडमधील मराठा समाज आता एक झाला आहे, गर्व वाटेल असं काम(Manoj jarange) करतोय. आज बीडची (Beed)गर्दी पाहून सत्ताधारी बेजार झालेत. आता असंच मुंबईला जायचं.