Advertisement

चोरटयांनी फोडले हॉटेल  

प्रजापत्र | Tuesday, 20/05/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.२०(प्रतिनिधी ):शहरातील (Beed)घुमरे हॉस्पिटल शेजारी असलेल्या हॉटेलचा अज्ञात चोरटयांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करत हॉटेलच्या साहित्यासह रोख रक्कम लंपास केल्याची घटना (दि.१८) रविवार रोजी घडली असून २४,२०० रुपयांचा एवज लंपास केल्याप्रकरणी (Beed police)शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विनोद रामनाथ बहिर (वय ४७)रा.शिरापूर धुमाळ ता. शिरूर कासार यांचे (Beed)बीड शहरातील घुमरे हॉस्पिटल शेजारी असलेल्या हॉटेलचा चोरटयांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करत आतील हॉटेलचे साहित्य एक पोह्याचा कट्टा, रोख रक्कम १५०० रुपये, गोडतेलाचे दोन डब्बे असा एकूण २४ हजार २०० रुपयांचा एवज 
चोरटयांनी लंपास केल्या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Beed police)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement