Advertisement

नागझरी येथील डोंगराला आग

प्रजापत्र | Friday, 02/05/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२ (प्रतिनिधी ):  जिल्ह्यासह(Beed) मराठवाडयात उन्हाच्या तीव्रतेत प्रचंड वाढ झाली. (Fire)या उन्हामुळे आगीच्या घटना वाढू लागल्या आहेत आज (दि.२) शुक्रवार रोजी सकाळी वनविभागाच्या नागजरी डोंगराला आग लागल्यामुळे डोंगरातील शेकडो झाडे जळून खाक झाले आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले हातेे. 

 

               नागझरी परिसरातील (Beed)डोंगराला आज सकाळी आग लागली. ही आग डोंगर परिसरात सर्वत्र पसरली. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. मात्र डोंगरात वाळलेले गवत असल्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती. या आगीत (Fire) लहान-मोठे शेकडो झाडे जळून खाक झाले. आग तीन ते चार तास आटोक्यात आली नव्हती. घटनास्थळी सामाजीक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे हनुमंत वारभट, दशरथ गुजर, विलास नवले, शंकर शिंदे, मधुकर नैराळे, बबन पाव्हणे ,गौतम वीर, चंद्रकांत बडगे ,महेश मेटे ,शेख अकबर, परमेश्‍वर पाव्हणे,परमेश्‍वर नाईक, शहादेव चव्हाण, बळीराम चव्हाण ,संदीप पवार,मधुकर वारभट, लक्ष्मण जाधव सह आदींनी घटनास्थळी जावून आग विझविण्याचा प्रयत्न केला.

 

Advertisement

Advertisement