Advertisement

  बीड दि. १४ (प्रतिनिधी ) : मागच्या काहीकाळात (Beed) बीड जिल्ह्यात ऊर्जा कंपन्यांनी सामाजिक अस्वस्थता वाढविली आहे. या कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर दडपशाही सुरु आहे, त्याला प्रशासनाची देखील साथ आहे . मात्र जिल्ह्यातील पावन ऊर्जा कंपन्या पोलिसांनी घालून दिलेल्या सुरक्षा ऑडिटच्या निकषात सपशेल फेल ठरल्याचे समोर आले असून स्वतः पोलीस अधीक्षकांनीच याला दुजोरा दिला आहे.

 

 

 मागच्या काळात ऊर्जा कंपन्यांच्या (Beed)साहित्याच्या चोरीच्या घटना घडल्या . या (Uraja)ऊर्जा कंपन्यांचे संबंध थेट दिल्लीपर्यंत असल्याने सध्या ऊर्जा कंपनीला शिंक जरी आली तरी पोलीस आणि प्रशासन झाडून कामाला लागते, त्यामुळे ऊर्जा कंपनीमधील चोरीचे गुन्हे उघडकीस देखील आले. मात्र ज्या ऊर्जा कंपन्यांकडे शेतकऱ्यांना घाबरवायला , दडपशाही करायला बाउन्सरची फौज आहे, त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेत त्रुटी का ? हा प्रश्न उपस्थित होत होता. या सर्व कंपन्यांना सुरक्षा ऑडिट करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यात कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र , प्रकल्पांच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा, त्याचे बॅकअप घेण्याची यंत्रणा , आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची यंत्रणा या साऱ्या बाबी कंपन्यांनी परिपूर्ण ठेवणे अपेक्षित आहे. तशा सूचना या कंपन्यांना पोलिसांकडून लेखी देण्यात आल्या होत्या . मात्र या सूचनांचे पालन कंपन्यांकडून होत नसल्याचे समोर आले आहे. या कंपन्यांकडून सुरक्षा ऑडिटमधील निकषांचे पालन होत नसल्याच्या माहितीला पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दुजोरा दिला आहे. मग कोट्यवधींचा फायदा या कंपन्यांनी कमवायचा , स्वतःच्या सुरक्षेचे उपाय योजायचे नाहीत आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी मात्र पोलिसांनी घ्यायची. या कंपन्यांकडे (Farmer)शेतकरी आणि सामान्यांना घाबरवायला यंत्रणा आहे, मात्र चोऱ्या रोखण्यासाठी साधे (Cctv)सीसीटीव्ही सुरु ठेवता येत नाहीत याला काय म्हणायचे ?

Advertisement

Advertisement