गेवराई (प्रतिनिधी) - गांवात जबरी चोरी, दरोडा असे प्रकार सातत्याने घडत होते याच गुन्ह्यातील पाच अट्टल दरोडे खोरांना मोठ्या शिताफितीने चकलांबा पोलिसांनी मुसक्या आवळल्या असुन त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी लाखोंचा मुद्देमालही ताब्यात घेतला आहे. या टोळीकडुन अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सविस्तर माहिती अशी कि, काही दिवसात चकलांबा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तीन जबरी चोरीचे तसेच पाच रात्रीच्या घरफोड्या, एक दिवसाची घरपोडी झालेली आहे. परंतु चकलांबा पोलीस स्टेशन कडील अधिकारी कर्मचारी यांनी जिगर दाखवत तीनही जबरी चोऱ्या उघडकीस आणून आरोपी सह मुद्देमाल जप्त केला आहे. रात्रीच्या घरफोडीचे मोठे आव्हान चकलांबा पोलिसांसमोर होते. चकलांबा पोलीस घरफोडी करणाऱ्या चोरांच्या मागावर बऱ्याच दिवसापासून नि होते. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीप्रमाणे चकलांबा पोलिसांना मोठ्या सीताफीने रेकॉर्ड वरील अट्टल पाच दरोडेखोरांना पकडण्यात यश आले त्यांच्यावर दरोडा घरफोडी, जबरी चोरी, ता मोक्का यासारखे अनेक गंभीर गुन्हे विविध जिल्ह्यात व पोलीस स्टेशनला दाखल असून त्यांना संबंधित गुन्ह्यात अटक केली असून लाखोंचा मुद्यमाल जप्त करण्यात आलेला आहे.चकलांबा पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू, एक लोखंडी रॉड जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून जिल्ह्यातील बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच या पाच अठ्ठल दरोडेखोरांच्या मुसक्या चकलांबा पोलिसांनी आवळल्या आहे यामध्ये १) दीपक गोतम पवार २) गोविंद गोतम पवार ३) राजेश दिलीप भोसले सर्व राहणार टाकळी अंबड ता पैठण.जि संभाजीनगर ४) नितीन मिश्रा चव्हाण रा जोड मालेगाव ता.गेवराई जि बीड ५) किशोर दस्तगीर पवार रा.पैठण जिल्हा संभाजीनगर असे असून सदर कारवाई ही पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पाडकर उपविभागिय पोलिस अधिकारी, नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे, पोलिस उपनिरीक्षक अनंता तांगडे, पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे, सफोक गाडे, पोह बारगजे, पोह.केदार, पोह.खेडकर, पो शि खेत्रे, पो शि घोंगडे यांनी केली.

