Advertisement

टाकळीच्या आंदोलनकर्त्यांची आयजी घेणार भेट!

प्रजापत्र | Tuesday, 23/06/2026
बातमी शेअर करा

बीड-केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुलेचा खून झाल्यानंतर तीन दिवस उलटूनही जमाव शांत होतं नसल्याने आणि आज सकाळी सभागृहात आ. धनंजय मुंडे यांनी आक्रमक होतं घुलेच्या न्यायासाठी आवाज उठवाल्यानंतर अखेर आयजी विरेंद्र मिश्रा बीडमध्ये दाखल झाले होते. बीडला पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्याशी चर्चा केल्यानंतर अखेर मिश्रा हे केजच्या दिशेने रवाना होतं असल्याची प्राथमिक माहिती आहे.सध्या केजच्या पोलीस ठाण्यात घुलेचा मृतदेह आणून ठेवण्यात आल्यामुळे केजमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
   केजमधील विलास घुले या तरुणाचा खून होऊन तीन दिवस झाल्यानंतर ही सर्व आरोपीना अटक होतं नसल्याने आणि तपास खोलवर करत नसल्याने टाकळी गावातील हजारो लोकंआज सकाळपासून रस्त्यावर उतरले असताना आता केजच्या पोलीस ठाण्यात विलास घुलेचा मृतदेह रुग्णवाहिकेतून आणून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली होती.सध्या केजमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून छत्रपती संभाजीनगरवरून आयजी विरेंद्र मिश्रा बीडमध्ये आले आणि त्यांनी माहिती जाणून घेतली. आता मिश्रा बीडमधून केजच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती आहे.त्यामुळे आज सायंकाळी तरी विलास घुलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Advertisement

Advertisement