Advertisement

राष्ट्रपती उत्कृष्ट सेवा पदकांसाठी महाराष्ट्रातील ५ पोलीस अधिकाऱ्यांची वर्णी

प्रजापत्र | Friday, 14/08/2026
बातमी शेअर करा

नागपूर: पोलीस आणि नागरी संरक्षण दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या मानाच्या राष्ट्रपती उत्कृष्ट सेवा पदकांसाठी महाराष्ट्रातील ५ पोलीस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

   स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला गृह मंत्रालयातर्फे महाराष्ट्रातील पोलीस, कारागृह, अग्निशमन आणि होमगार्ड सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक  आणि शौर्य व गुणवत्तापूर्ण सेवा पदक  जाहीर केले आहेत.राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने १४ ऑगस्ट रोजी पत्र जारी करत पदकांना सन्मानित केलेल्यांची घोषणा केली आहे.

 

या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती उत्कृष्ट सेवा पदक

मानाच्या राष्ट्रपती पोलीस सेवा उत्कृष्ट सेवा पदकासाठी सन्मानित करण्यात आलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील अपर पोलीस महासंचालक शिरीष रवींद्र जैन, उपपोलीस अधीक्षक सुभाष नानासाहेब भुजबळ साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय राजाराम वायचळे यांची वर्णा लागली आहे. कारागृह सेवा गटात सुभेदार संजीव सखाराम घाणेकर, हवालदार संजय राजारामजी तळवारे यांची गुणवत्तापूर्ण सेवा पदक यांची निवड करण्यात आली आहे.

 

पोलीस सेवा श्रेणीत ३७ अधिकारी, कर्मचारी….

पोलीस सेवा श्रेणीत महाराष्ट्रातील ३७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे. यात उप पोलीस महानिरीक्षक संजय बाजीराव जाधव, उप पोलीस महानिरीक्षक विजयकुमार गोपीनाथ मगर , पोलीस अधीक्षक दिगंबर पांडुरंग प्रधान, उपपोलीस अधीक्षक प्रशांत कुलकर्णी, भागीरथ देशमुख, प्रवीण तेजले, मनोजकुमार यादव, पोलीस निरीक्षक वैभवकुमार जाधव, संतोष बारगे, विश्वजीत कागिंडे, जितेंद्र कदम, विनोद पाटील, प्रदीप चौगावकर यांच्यासह अनेक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे.

 

अग्निशमन सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणारे मुख्य अग्निशमन अधिकारी शंकर उत्तम मिसाळ, अग्निशामक शैलेश महादेव जगताप यांची निवड करण्यात आली आहे. गृहरक्षक व नागरी संरक्षण क्षेत्रातील कार्यासाठी पोपट रामजी सांगडे , अशोक नामदेव इंगळे, मनोज सदाशिव बारसागडे यांचा सन्मान करण्यात आला आहे. कारागृह सेवेतील कार्यासाठी अधीक्षक विकास हनुमंत राजनाळवार आणि हवालदार महेश लक्ष्मण गडनाईक यांना सन्मानित केले जाणार आहे.

Advertisement

Advertisement