Advertisement

आपण कुठेही आणि कुणासोबतही जाणार नाही,यायचं असेल तर आमच्यासोबत या-शरद पवार

प्रजापत्र | Monday, 28/09/2026
बातमी शेअर करा

मुंबई दि.२८(प्रतिनिधी):गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात शरद पवार हे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएसोबत जाणार, अश्या चर्चा रंगल्या होत्या.मध्यंतरी पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट झाल्यामुळे या चर्चाना आणखीनच हवा मिळाली होती. मात्र, सोमवारी मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात शरद पवार यांनी आपण एनडीएसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यासोबतच शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि अजित पवार गटाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांना अप्रत्यक्षरित्या संदेश दिला. 
    आपल्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. हो, चर्चा सुरू आहे. मला त्यांना सांगायच आहे. आपण कुठेही जाणार नाही. आम्ही कुणासोबत जाणार नाही. यायचं असेल तर आमच्यासोबत या, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात शरद पवार यांचा पक्ष राज्यात महाविकास आघाडी आणि देशपातळीवर इंडिया आघाडीसोबत राहून काम करेल, हे स्पष्ट झाले आहे.मध्यंतरी शरद पवार हे भाजपसोबत हातमिळवणी करुन एनडीए आघाडीत सामील होतील, अशी जोरदार चर्चा होती. त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होईल, अशीही वदंता होती. मात्र, शरद पवार यांनी या सर्व शक्यता पार धुडकावून लावल्या आहेत. शरद पवार यांनी आज पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतील चर्चेविषयीही माहिती दिली. आम्ही अडीच तास एकत्र बसलो आहोत. मला अनेक वेगवेगळ्या मागण्या दुष्काळाचा निमित्ताने ऐकायला मिळाल्या. प्रांताध्यक्ष यांनी सूचना दिल्यानुसार आपण काय निवेदन आंदोलन करताना द्यायच्या आहेत, हे सांगितलं आहे. रविवारी कोअर कमिटी बैठक आम्ही घेतली. राज्य सरकारने काय काय देणे अपेक्षित आहे त्याचे निवेदन दिलं आहे. आम्ही दोन चार दिवसांत सरकारकडे याबाबत आग्रह करू. आपल्याला भांडण करायचं नाही जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करु, असे शरद पवार यांनी म्हटले.

Advertisement

Advertisement