बीड दि.30 (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त लागला असून शनिवारी जाहीर झालेल्या यादीतून चार पोलीस निरीक्षक आणि तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या जिल्हा बाहेर बदल्या झाल्या आहेत.तर तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बीडला येणार असून दोन सहाय्यक पोलीस निरीक्षकांना मात्र मुदतवाढ मिळाल्याचे पाहायला मिळाले.
बीड जिल्ह्यात कालावधी पूर्ण झालेल्या अधिकार्यांच्या बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक बालक कोळी, पोलीस निरीक्षक देवीदास गात आणि सध्या पेठ बीड ठाण्याचे प्रभारी असलेल्या मारोती खेडकर आणि नारायण एकसिंगे यांचा बीड जिल्ह्यातून झालेल्या बदल्यांमध्ये समावेश आहे तर सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये महेंद्रसिंग सुरेंद्रसिंग ठाकूर,भार्गव सुदाम सपकाळ आणि संतोष तेजराम जंजाळ यांच्या जालना येथे बदल्या झाल्या आहेत.तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीणवरून सपोनि जनाबाई आश्रुबा सांगळे, धाराशिववरून सपोनि कल्याण भास्कर नेहरकर आणि सपोनि सुरेश कचरू नरवडे बीड जिल्ह्यात येत आहेत.तर चंद्रकांत गोविंद गोसावी आणि रत्नाकर मधुकर घोळवे या दोन अधिकार्यांना 1 वर्ष मुदतवाढ मिळाली आहे.दरम्यान ठाकूर यांनी बर्दापूर तर सपकाळ यांनी अंमळनेरचे प्रभारी म्हणून काम केले होते.जंजाळ यांनी गेवराईला दुय्यम अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली होती.तसेच चंद्रकांत गोसावी यांनी नेकनूरमध्ये कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली झाली होती.आता त्यांना बीड जिल्हयात एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. देवीदास गात यांचा जिल्ह्यातील कालावधी पुर्ण होण्याआधीच बदली झाली असून बालक कोळी यांचा कालावधी पुर्ण झाल्यामुळे बदली झाली आहे. गात हे सोलापूरच्या पोेलीस प्रशिक्षण केंद्रात गेले असून बालक कोळी सोलापूर शहरला गेले आहेत तर नारायण एकसिंगे यांची मुंबईला झालेली बदली रद्द झाली असून ते रायगडला जाणार आहेत. तसेच पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांची बदली पुणे शहरला झाली आहे.

बातमी शेअर करा
