धाराशिव दि.२४(प्रतिनिधी): - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला असून, राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या ३००० अत्याधुनिक बसेसचे लोकार्पण आज मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडले.
या बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विविध मान्यवर मंत्री, आमदार आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि जलद होणार आहे. नव्या बसेसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, यामुळे एसटी सेवेची गुणवत्ता अधिक उंचावणार आहे.
या उपक्रमामुळे एसटी महामंडळाला नवी ऊर्जा मिळणार असून, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात मोठी सोय निर्माण होणार आहे. विशेषतः ग्रामीण भाग ते शहरी भाग यांना अधिक सक्षमपणे जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम या बससेवेच्या माध्यमातून साध्य होणार आहे.
सार्वजनिक परिवहन सेवा अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रवासी-केंद्रित करण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

प्रजापत्र | Tuesday, 24/03/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
