बीड दि.१० (प्रतिनिधी): जिल्ह्यात आत्महत्येच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी खळवळ उडाली असून पाटोदा येथे एका निवृत्त लष्करी जवानाने तर गेवराईत एका शेतकऱ्याने आपले जीवन संपवले आहे.
पाटोदा येथील माऊली नगर भागात राहणारे उद्धव जायभाये या माजी सैनिकाने राहत्या घरासमोरील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसऱ्या घटनेत गेवराई तालुक्यातील पोळाचीवाडी येथील रखमाजी नारायण जाधव या शेतकऱ्याने नैराश्यातून विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. चोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
बातमी शेअर करा

