बीड दि.१५(प्रतिनिधी):शहरातील शिंदे नगर कॅनॉल रोड येथील घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवार (दि.११) रोजी रात्री घडली असून चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्हयात चोरी,घरफोडी अश्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून शहरातील जयराम हरिभाऊ निर्मळ (वय ३०) रा.शिंदे नगर कॅनॉल रोड बीड यांच्या राहत्या घरासमोर लावलेली हिरो स्प्लेंडर कंपनीची दुचाकी क्र.एमएच.२३ बी.एफ. ०२७२ हिचे अज्ञात चोरट्यांनी हॅण्डल लॉक तोडून रविवार (दि.११) रोजी रात्री लंपास केली असून अंदाजे ३०,००० रुपयांचे नुकसान झाल्याप्रकरणी जयराम निर्मळ यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बुधवार (दि.१४) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा

