Advertisement

 चौदा वर्षीय तरूणीची आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 29/12/2025
बातमी शेअर करा

 केज दि.२९(प्रतिनिधी): तालुक्यातील (Kaij)तांबवा येथील इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेत जीवनयात्रा संपवली.या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे. 
        अधिक माहितीनुसार केज तालुक्यातील तांबवा येथील तनुजा गोविंद चाटे (वय १४) ही रविवार (दि.२८) रोजी शाळेला सुट्टी असल्यामुळे घरीच होती. दुपारी तिने  घरातील खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला. त्यानंतर खोलीतील फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास लावून जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच रविवारी दुपारी ४:३० च्या सुमारास केज पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, उमेश निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा केला.पोलिसांनी तात्काळ मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. 

Advertisement

Advertisement