मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकींची घोषणा झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. या महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १६ जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये युती आणि आघाडी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीआधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र यात बोगस लाभार्थी घुसल्यानंतर या योजनेवर निर्बंध आणण्यात आले असून लाभार्थींना ईकेवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. अद्याप लाभार्थी महिलांचे ईकेवायसी पूर्ण झालेले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
बातमी शेअर करा

