Advertisement

बीडमध्ये राष्ट्रवादी पुन्हा; प्रेमलता पारवे विजयी

प्रजापत्र | Sunday, 21/12/2025
बातमी शेअर करा

 बीड-पालकामंत्री अजित पवार आणि पंडितांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच लढलेल्या बीड नगरपालिका निवडणुकीत अखेर घडीने बाजी मारली असून प्रेमलता पारवे नगराध्यक्ष म्हणून विराजमान होणार आहेत. बीडमध्ये भाजप आणि तुतारीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
 

 

    बीड नगरपालिकेत कोण बाजी मारणारा याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. सुरुवातील भाजपच्या उमेदवाराने निवडणुकीत लीड कायम ठेवल्यानंतर शेवटच्या टप्प्यात घडीच्या उमेदवाराला जनतेचा कौल मिळाला आहे.अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत संपादक शेख मुजीब यांच्या सासू असलेल्या प्रेमलता पारवे या 3779 मताने विजयी  झाल्या आहेत. बीडमध्ये घडीला मिळालेला प्रतिसाद क्षीरसागर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.गेवराईत पंडितांना गड राखता आला नसला तरी बीडमध्ये मात्र त्यांनी बाजी मारून अनेकांना धक्का देण्याचे काम केले आहे.

Advertisement

Advertisement