अंबाजोगाई दि.१८(प्रतिनिधी): बर्दापूर पासून जवळच असलेल्या जवळगाव शिवारात अनोळखी तरुणाचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दुपारी उशिरापर्यंत तरूणाची ओळख पटलेली नव्हती. सदरील प्रकार घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त होत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील जळगाव शिवारातील एका शेतामध्ये आज सकाळी अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच बर्दापुर पोलीस ठाण्याचे सपोनि श्री.कांबळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.दुपारी उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. सदरील तरूणाच्या चेहऱ्यावर काही ठिकाणी जखमा (वळ) असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात असला तरी तपासा अंतीच पुर्ण माहिती समोर येईल.
बातमी शेअर करा

