बीड दि.१५ (प्रतिनिधी): शहरातील (Beed) घोलप कोचिंग क्लासेस समोरून जात असताना अज्ञात दोघांनी दुचाकीवर येत एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र,मिनी गंठण असा एकूण ७०,००० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवार (दि.१४) रोजी घडली असून अज्ञात (Crime) आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बीड(Beed) जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत असून सुनीता प्रेमचंद्र गायकवाड (५८) रा.अंबिका नगर,पालवण रोड ह्या त्यांच्या नातेवाईकांना भेटून शहरातील घोलप कोचिंग क्लासेस समोरून पायी जात असताना अज्ञात दोघांनी (Beed police)दुचाकीवर येत त्यांच्या गळ्यातील १३ ग्रॅमचे मिनी गंठण अंदाजे किंमत ६०,००० रुपये व २ ग्रॅमचे मंगळसूत्र अंदाजे किंमत १०,००० रुपये असा एकूण ७०,००० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवार (दि.१४) रोजी सायंकाळी ०६ च्या सुमारास घडली असून अज्ञात दोन आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुनीता गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा
