बीड दि.१३ (प्रतिनिधी)-येथील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पत्त्याच्या क्लबवर पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांच्या पथकाने छापा मारून साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पूजा पवार यांच्या अवैध धंद्यावरील कारवाया शहरात चर्चेचा विषय ठरत आहेत.
पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासुन पत्त्याचा क्लब सुरू असल्याची माहिती डीवायएसपींना मिळाली होती.त्यानुसार पूजा पवार यांनी आपल्या टीमला कारवाईचे आदेश दिले होते.त्यानुसार पीएसआय काटकर,सय्यद,सचिन आगलावे,सुधीर हजारे आणि अनिल घटमाळ यांनी शुक्रवारी (दि.१२) रात्री ११.३० च्या सुमारास गांधी नगरमध्ये पत्र्याच्या घरातून चालणाऱ्या क्लबवर छापा मारला. यावेळी नगदी रोक्कड,मोबाईल,कॉम्प्युटरसह एकूण ५ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दरम्यान यावेळी पोलिसांनी आठ आरोपीना ही ताब्यात घेतले असून पेठ बीड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
