बीड दि.१३ (प्रतिनिधी): धुळे–सोलापूर महामार्गासह बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रवाशांची वाहने अडवून शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवार (दि.१२) रोजी अटक करत त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.
धुळे–सोलापूर महामार्गावरील वडगाव ढोक ता.गेवराई येथे रस्त्यावर परराज्यातील प्रवाशांची गाडी आडवून. आरोपींनी वाहनातील प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने गुरुवार (दि.४) रोजी चोरून नेली होती. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसेच बीड शहरातील संभाजी महाराज चौक परिसरात चालक झोपलेला असताना वाहनाची काच फोडून प्रवाशांना मारहाण करत सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल होता.यांसह दोन गुन्हे देखील उघडकीस आले असून गुरुवार (दि.११) रोजी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची माहिती मिळाली. आरोपी चारचाकी वाहनातून कळंब–केज मार्गे येत असल्याची माहिती मिळताच पथकाने नाकाबंदी केली. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पाठलाग करून १)राहुल अनिल काळे (वय १९),२). विकास अनिल काळे (वय २१),३). अनिल रामा काळे (वय ४०)(सर्व रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.चौकशीत आरोपींनी त्यांचे अन्य साथीदार सुनील हिरामण शिंदे, सचिन उर्फ आवड्या रामा काळे व बबलू शिवा शिंदे यांच्यासह वरील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.आरोपींकडून विना नंबरची एमजी हेक्टर चारचाकी गाडी , एक कोयता व लोखंडी रॉड जप्त करण्यात आले आहेत.शुक्रवार (दि.१२) रोजी आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि अण्णासाहेब पवार करीत आहेत.सदरील कारवाई नवनीत कॉवत,पोलीस अधीक्षक, बीड, सचिन पांडकर,अप्पर पोलीस अधीक्षक,शिवाजी बंटेवाड (स्थागुशा, बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी केली.

