बीड-नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर (Beed police)बीड जिल्हा पोलीस दलातील प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या मोठयाप्रमाणावर करण्यात आल्याचे चित्र आहे.गेवराई पोलीस ठाण्याचे प्रवीणकुमार बांगर यांची शिवाजीनगर बीड (Beed) येथे बदली करण्यात आली. तर गेवराईला आता शिवाजीनगरवरून किशोर पवार जाणार आहेत.याशिवाय ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांची पुन्हा एकदा बदली झाल्याचे कळते. ते पेठ बीड पोलीस ठाण्याचा पदभार घेतील. तर पेठ बीडचे अशोक मुदिराज यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी ही खांदेपालट केली आहे.
बातमी शेअर करा

