चकलांबा दि.२ (प्रतिनिधी)::गेवराई तालुक्यातील आडपिंप्री येथील घराचा दरवाजा तोडून सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा ऐकून ५६,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवार (दि.३१) रोजी रात्री घडली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढले असून धुमेगाव,आडपिंप्री परिसरात मागील आठ ते दहा दिवसापासून चोरांचा सुळसुळाट सुरु आहे.आडपिंप्री येथील नारायण गणपत गलधर (वय ५०) हे व त्यांच्या कुटूंबातील सर्वजण शुक्रवार (दि.३१) रोजी संध्याकाळी ९:३० च्या सुमारास झोपले रात्री सर्व जण झोपेत पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून कपाटाचे कुलूप तोडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा ऐकून ५६,००० रुपयांचा ऐवज लंपास केला. शनिवारी रात्री २:३० च्या सुमारास नारायण गलधर हे लघुशंखेसाठी उठले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला त्यांनी त्यांच्या पत्नीला आवाज देऊन उठवले घरातील कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेले पाहून त्यांनी लगेच कपाटाची पाहणी केली असता लॉकर मधील ६ ग्रॅम वजनाची पोत व २०,००० हजार रुपये नगदी असे ऐकून ५६,००० हजार लंपास झाल्याचे निदर्शनात आले.नारायण गलधर यांच्या फिर्यादीवरून शनिवार (दि.१) रोजी चकलांबा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चकलंबा पोलीस करत आहेत.

