वडवणी दि.२९ (प्रतिनिधी ): तालुक्यातील (Wadwani) कवडगाव येथे अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून घरातील नगदी रक्कम व सोन्याच्या दागिने असा एकूण ११ लाख २० हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा (Crime)प्रकार मंगळवारी पहाटे घडला आहे.
जिल्हाभरात (Beed)सणासुदीच्या काळात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.वडवणी (Wadwani)तालुक्यातील कवडगाव येथील रहिवासी व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बबनराव धुराजी मांजरे यांच्या घरी मंगळवार (दि.२८) रोजी अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून त्यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवुन कपाटातील रोख रक्कम व बाजूच्या खोलीमध्ये असलेल्या लोखंडी पेटीमध्ये मुलाच्या लग्नासाठी ठेवलेले सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ११ लाख २० हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली (Police) असून पुढील तपास सपोनि वर्षा व्हगाडे या करत आहेत.

बातमी शेअर करा
