बीड दि.२५ (प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगर येथून माहेरी बीडकडे मोटारसायकलवरून येत असताना राक्षसभुवन फाट्याच्या पुढे मोटारसायकलवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी मोहन भास्कर रेनीवाल यांची दुचाकी अडवून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील ५० हजाराचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवार (दि.२३)रोजी घडली असून या प्रकरणी रेनीवाल यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे तर पाटोदा येथील बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी राजेश्री संदीपान आगाम यांच्या गळ्यातील १ लाख २५ हजारांचे दागिने ओरबाडून चोरून नेल्याची घटना शुक्रवार (दि.२४) रोजी घडली. या प्रकरणी आगाम यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बातमी शेअर करा

