नेकनूर दि.२० (प्रतिनिधी): नेकनूरच्या विकासासाठी नेहमीच झुकते माप दिले असून मंत्री पंकजा मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली भाजपा विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे आ. नमिता मुंदडा यांनी प्रतिपादन केले. श्री गुरु बंकटस्वामी देवस्थान नेकनूर येथे प्रसादालय बांधकाम,भक्तनिवास,संरक्षण भिंत,स्वच्छतागृह बांधकाम करण्यासाठी तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत ३ कोटी रुपये कामाचे उद्घाटन मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे,आ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. तर या विकास कामाच्या निधीसाठी माजी जिल्हापरिषद सदस्य भारत काळे यांनी पाठपुरावा केला होता.
या कार्यक्रमाला नंदकिशोर मुंदडा, भारत काळे, पांडुरंग होमकर यांची उपस्थिती होती. यावेळी आ. नमिता मुंदडा यांनी नेकनूरच्या विकासासाठी नेहमीच झुकते माप दिले असून मंत्री पंकजा मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली भाजपा विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले केंद्र आणि राज्यातील सत्तेचा फायदा घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हापरिषद ,पंचायत समिती भाजपाकडे असणे गरजेचे असल्याचे सांगितले .यावेळी कालिदास पाटील ,दादाराव काळे ,कल्याण शिंदे,पांडुरंग कानडे,गोरख काळे,अभिमान शिंदे,महेंद्र फुटाणे,विठ्ठल जाधव,बंडू कदम,बाजीराव काळे,बंडू देवगुडे,राम आबा शिंदे,संजय शिंदे,अशोक राऊत,राजेंद्र राऊत,विश्वनाथ सातपुते,चक्रधर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अशोक शिंदे,जय निर्मळ,विलास राऊत,राजेभाऊ निर्मळ,सतीश मुळे,दादाराव जाधव,राकेश शिंदे त्रिंबक काळे,फुलचंद काळे,मच्छिंद्र काळे,हनुमान काळे,जगन्नाथ नन्नवरे, मधुकर काळे, नवनाथ शिंदे, चक्रधर अण्णा शिंदे,अनिल निर्मळ,बाळासाहेब कानडे,अभिमान शिंदे,अशोक कानडे,संतोष शिंदे,मतीन खतीब,जिया शेख,अमेर जागीरदार, शिवाजी विठ्ठल शिंदे,बिभीषण नन्नवरे,गणेश काळे व सर्व स्वामी भक्त, पंचक्रोशीतील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक उपस्थित होते.